पुण्यासारख्या मध्यमवर्गीय व उच्य मध्यमवर्गीयांच्या शहरात, ज्या घरात शाळेत जाणारी मुले असतात, त्या मुलांना सायकल आणली जाते. मुले दहावी पास झाल्यावर कॉलेजला जाऊ लागतात तशी स्कूटर चालवायला लागतात आणि सायकल पडून राहते.

दुसरीकडे खेडे गावात असे चित्र दिसते की मुले खूप दूर वर चालत शाळेत जातात. हे अंतर खूप असते व मुले दमून जातात.

जिल्हा परिषद शाळा नंबर एक, आरग (ता मिरज जिल्हा सांगली) येथील काही मुले 5 ते 7 किलो मिटर अंतर कापून वाडी वस्ती वरून चालत येतात. ही बहुतांश मुले गरीब घरातली आहेत.

आपल्या कडील वापरात नसलेली सायकल जिल्हा परिषद मुलांची शाळा नंबर 1,

आरग येथील गरजू विद्यार्थ्यांना पाठवण्याचा प्रकल्प आम्ही हाती घेतला आहे.